भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौभासचे सदस्यता अभियान सुरू केले गेले आहे

मागील दोन दिवसांपासून 28 सप्टेंबर, भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौभासचे सदस्यता अभियान सुरू केले गेले आहे. त्याचा भाग म्हणून पुण्यातील तळजाई उद्यानासमोर आणि अझम कॅम्पसला बुक स्टॉल लावण्यात आला. ह्यावेळी तरुण-तरुणींशी साथींनी संवाद साधला. तरुण-विद्यार्थांना नौभासच्या क्रांतिकारी वारशाचा परिचय करून देणे, आज आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या समस्यांना चर्चेचे मुद्दे बनवून त्यावर सखोल चर्चा करणे, तरुणांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर कृतिशील होऊन संघटित होण्याचे आवाहन करत हे अभियान चालवले गेले. यामध्ये तरुणांचा छान प्रतिसादही मिळत आहे.
ह्या अभियानांमधून तरुणांपर्यंत भगतसिंहासोबतच इतर प्रगतिशील साहित्य सुद्धा पोहचवले जात आहे.
नौजवान भारत सभा
संपर्क: 8956840785

Related posts

Leave a Comment

three × 4 =