
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे 23 ऑगस्ट रोजी अंबेडकर कॉलेज, चेंबूर बाहेर सदस्यता अभियान चालवण्यात आले. शहीद भगतसिंह यांचा जन्मदिवस आणि नौभासचे द्वितीय राष्ट्रीय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नौभास तर्फे देशातील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवले जात आहेत. आज फासिस्ट भाजप सरकारच्या काळात देशात बेरोजगारी एखाद्या रोगासारखी पसरली आहे आणि देशातील तरुणांचे लक्ष विचलित करण्यासाठी दिवस रात्र त्यांना धार्मिक कट्टरतेच्या विषाचा खुराख दिला जातोय. अशा काळात नौभास भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे स्वप्नं पूर्ण करण्याचे आवाहन युवकांना करत आहे. असे स्वप्नं जिथे समाजात आसमानतेची दरी नसेल जी आज आपण पाहतो, ज्यात फक्त काही मोजक्या लोकांना उच्च दर्जाचे शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळतात आणि बहुसंख्य लोकांना दोन वेळेच्या जेवणासाठी धडपड करावी लागते.
अभियानादरम्यान पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला आणि विद्यार्थ्यांमध्ये पत्रके वाटण्यात आली ज्यात महागाई, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर संघटित हल्ला आणि जातीय दंगलींनी हतबल झालेल्या आपल्या देशाच्या सद्यस्थितीचे वर्णन केले गेले आहे. त्याचबरोबर देशातील 30 कोटी बेरोजगार तरुणांचे जीवन चित्रित करणारे पथनाट्य “राजा का बाजा” नौभास च्या सदस्यांनी सादर केले.
सर्वांसाठी मोफत आणि समान, दर्जेदार शिक्षण आणि रोजगार हमी यांसारख्या मागण्यांसाठी संघटित होण्याचा संदेश जास्तीत जास्त विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी नौजवान भारत सभा पुढील महिनाभर सदस्यता अभियानामार्फत शहीदे आझम भगतसिंह यांचा संदेश तरुणांपर्यंत नेण्याचे काम करेल.
आपणा सर्वांना आम्ही नौजवान भारत सभेत सामील होण्याचे तसेच ह्या अभियानांसाठी आणि नौभासच्या द्वितीय राष्ट्रीय संमेलनासाठी शक्य तितका आर्थिक सहयोग करण्याचे आवाहन करत आहोत.
AVINASH KUMAR
STATE BANK OF INDIA.
A/C NO. – 33887284635
IFSC CODE – sbin0016612
Google pay and
phone pay: 8826265960
नौभास सोबत जोडून घेण्यासाठी संपर्क :-
7667230795
