नौजवान भारत सभेतर्फे बुधवारी पुण्यातील गुडलक चौक येथे पोस्टर प्रदर्शन लावून ‘देशाला पुढे न्या’ ह्या पथनाट्याचे 4 प्रयोग सादर करण्यात आले. ‘देशाचा विकास होत आहे म्हणजे नेमका कोणाचा विकास होत आहे’ यावर भाष्य करणाऱ्या या पथनाट्याला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पथनाट्य सादर केल्यानांतर पत्रकं वाटून सहयोग सुद्धा गोळा करण्यात आला. पथनाट्यानंतर अनेक तरुण-विद्यार्थ्यांसोबत देशातील आजच्या समस्यांवर चर्चा झाली. भगतसिंहाचा वारसा पुढे चालवण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या नौभाससोबत जोडून घेण्याची अनेकांनी इच्छा दर्शवली. सर्वांना समान, मोफत दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसुविधा, प्रत्येक हाताला काम या योग्य मागण्या असल्याचे आणि यांसाठी तरुणांनी एकत्र येऊन लढण्याची अत्यंत गरज असल्याचे अनेकांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.
येत्या काळामध्ये शहराच्या विविध भागांमध्ये पथनाट्याचे आयोजन केले जाणार आहे. नौभासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नक्की संपर्क करा.
नौजवान भारत सभा, पुणे
संपर्क: 8956840785
