दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला अल्पयश!!
एस. एम. एस कंपनी स्थलांतरीत होईपर्यंत लढा पुढे देखील सुरूच राहील!!!
मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला लागूनच असणाऱ्या, बारा लाख जनसंख्या असलेल्या मानखुर्द गोवंडी मध्ये स्थित, सतत विषारी धूर बाहेर फेकणाऱ्या बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट अर्थात एस. एम. एस कंपनी स्थलांतरित व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द-गोवंडी मधील स्थानिक रहिवासी, संघटना मिळून संघर्ष करत आहेत. या संघर्षाचा परिणाम म्हणून अलीकडेच एका याचिकेवर सुनावणी करत असतांना मुंबई उच्च न्यायालयाने एस. एम. एस कंपनीला पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत स्थलांतरित होण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीने या अगोदर प्रत्येक वेळी सुनावणी दरम्यान स्थलांतरित होण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगत न्यायालयाकडून वेळ वाढवून घेत गेली अनेक वर्षे मानखुर्द – गोवंडीमध्ये विषारी धुराचा प्लांट चालू ठेवला होता.
2009 पासून सुरू असलेल्या या प्लांटमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात क्षय, दमा, इत्यादींसारखे श्वसनासंबंधीत आजार संपूर्ण मानखुर्द – गोवंडीत पसरले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून ह्या प्लांट विरोधात स्थानिक जनता संघर्ष करत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या विरोधाचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून मागील वर्षी नौजवान भारत सभा, एसएमएस हटाओ संघर्ष समिती तसेच अन्य सहयोगी संघटनांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार व बृहन्मुंबई महानगरपालिके बरोबर सातत्याने पाठपुरावा करत आंदोलने, निदर्शने केलीत. त्यायोगेच विषारी धूर फेकणाऱ्या ह्या कंपनीला मानखुर्द – गोवंडी सोडून जाण्यासाठी भाग पाडले आहे.
न्यायालयाने एस. एम. एस. कंपनीला स्थलांतरित होण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे जो एक दीर्घ कालावधी असल्यामुळे त्याला कमी करून लवकरात लवकर कंपनी मानखुर्द – गोवंडी मधून स्थलांतरित व्हावी यासाठी देखील दरम्यानच्या काळात संघर्ष केला जाईल.
लड़ेंगे! जीतेंगे!!
नौजवान भारत सभा
संपर्क – 9930095381
