पॅलेस्टिनी कार्यकर्ता बासेल याद्रा, हमदान बल्लाल आणि इस्रायलच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही डॉक्युमेंट्री बनवली आहे.
या फिल्ममध्ये मासाफेर येता हा इस्रायल व्याप्त वेस्ट बँक मधील भाग इस्रायली सैन्याची जागा म्हणून घोषित केला जाते आणि त्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांना कशाप्रकारे त्यांच्या घरातून बेदखल केले जाते याचे चित्रण केले आहे. 2019 – 2023 या काळात या डॉक्युमेंट्रीचे चित्रण करण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात पॅलेस्टिनी कार्यकर्ते इस्रायलच्या कोर्टात 22 वर्षे लढा देतात आणि त्यानंतर कोर्टाकडून निर्णय येतो की मासाफेर येता हा भाग इस्रायलच्या सैन्याचा प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. हा निर्णय लागू करण्यासाठी स्थानिक जनतेची घरे बुलडोझर आणून पडली जातात, स्थानिक पॅलेस्टिनी जनतेने मिळून बांधलेली शाळा पाडण्यात येते, पाण्याच्या विहिरींमध्ये सिमेंट ओतले जाते. त्याच भागात इस्रायली सेटलर्स लोकांची वसाहत सुद्धा बनवली जाते. या सर्व क्रूर अन्यायाच्या विरोधात पॅलेस्टिनी जनतेचा संघर्ष डॉक्युमेंट्री मध्ये दाखवला आहे. ही डॉक्युमेंट्री पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या सहअस्तित्वावर बोलते जे निश्चितपणे शक्य नाहीये. कारण इस्रायल ही एक सेटलर कॉलनी आहे. फक्त धर्मनिरपेक्ष पॅलेस्टाईनच या संघर्षाचा योग्य तोडगा असेल.
डॉक्युमेंट्रीवर चर्चा करताना हे साथी स्वप्नजाने मांडले की डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅलेस्टीनी जनतेला गेले 70
वर्ष त्यांच्या जमिनींवरून बेदखल केले जात आहे. इस्रायल हा देश नसून एक सेट्लर कॉलोनी आहे जिचा वापर ब्रिटन आणि अमेरिका या साम्राज्यवादी देशांकडून पॅलेस्टिनी जनतेचे दमन करण्यासाठी, त्यांना त्याच्या घरांमधून बेदखल करण्यासाठी, आणि त्यांच्या हत्या करण्यासाठी केला जातो.
साथी सिद्धार्थने मांडले की आज पॅलेस्टिनी जनतेचा संघर्ष इस्रायल पॅलेस्टाइन वादाचा खरा इतिहास जनतेपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. आज मोदी सरकार सुद्धा इस्रायल सरकार सोबत राजकीय संबंध मजबूत करत आहे. इस्रायल मधील झायोनिस्ट सरकार आणि हिंदुत्ववादी मोदी सरकार याची नैसर्गिक युती आहे. म्हणून आज मोदी सरकार वर सुद्धा इस्रायल सोबत सगळे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकणे गरजेचे.
साथी प्रणितने मांडले की भारतात अनेक ठिकाणी पॅलेस्टाईच्या समर्थनार्थ आंदोलने होत आहेत आणि त्याचे दमन करण्याचे काम फॅशिस्ट मोदी सरकार पासून ते केरळमधील तथाकथित कम्युनिस्ट सरकार करत आहे.
साथी सुस्मितने मांडले की आज आपल्या समोर ही जबाबदारी आहे की पॅलेस्टिनी जनतेच्या संघर्षात सोबत उभे राहण्याची. भारताने सुद्धा ब्रिटिशांशी लढून स्वातंत्र्य प्राप्त केले होते. आज पॅलेस्टाईनची जनता सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. जगभरात अमेरिका, युरोप, आफ्रिका सगळीकडेच सर्वधर्मीय जनता रस्त्यावर उतरून हा नरसंहार थांबण्यासाठी आंदोलन करत आहे. त्यांच्या स्थानिक सरकरांवर दबाव टाकत आहेत. जगभरात आणि भारतात BDS (Boycott, Divestment, Sanction) या नावाने जी चळवळ चालते त्यात आपण सर्वानी सामील झाले पाहिजे. या चळवळीचे उद्दिष्ट आहे की इस्रायल सोबतचे सर्व राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक तोडणे. भारतात सुद्धा आपण मोदी सरकारवर इस्राएल सोबतचे सगळे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संबंध तोडण्यासाठी दबाव बनवला पाहिजे. याचबरोबर ज्या देशी विदेशी कंपन्या इस्राएल सोबत कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करून नफा कमवत असतील अशा कंपन्यांवर पूर्ण बहिष्कार टाकावा लागेल. चर्चेच्या शेवटी अशा प्रकारच्या फिल्म स्क्रिनींग अजून झाल्या पाहिजेत आणि आपल्या देशात पॅलेस्टिनी जनतेचा खरा इतिहास पोहोचावा लागेल असे मांडले गेले.
