काल दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त फुलेवाडा, पुणे येथे नौजवान भारत सभे तर्फे बुकस्टॉलचे आयोजन करण्यात आले.

फुलेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले वास्तव्यास होते. याच ठिकाणी ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाच्या बैठका घेत असत, म्हणून या जागेचे विशेष महत्व आहे.

ज्योतिराव फुल्यांनी पुण्याच्याच भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशवपन थांबविण्यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन अशा एक ना अनेक गोष्टींतून ज्योतीराव-सावित्रीबाईंचा स्त्री समतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा दृष्टीकोन सुद्धा समोर येतो. स्त्री मुक्ती व जातीय उच्चाटनाच्या संघर्षांमध्ये फुल्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे.

बुकस्टॉलला विद्यार्थी युवकांनी व जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. बुकस्टॉलवरील भगतसिंहांचे जाती धर्माचे झगडे सोडा, क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा, मी नास्तिक का आहे?, बॉम्बचे तत्वज्ञान, भगतसिंह उद्धरणे तसेच पीटर क्रोपोटकिन यांचे तरुणांना आवाहन, इत्यादी पुस्तकांमध्ये जनतेने विशेष रस दाखविला.

विद्यार्थी – युवकांसोबत आजच्या समाजातल्या विविध प्रश्नांवर संवाद साधून क्रांतिकारी विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.

Related posts

Leave a Comment

seventeen − nine =