अहमदनगर येथे नागरिकता सुधार कायद्याविरोधात डावे पक्ष पुरोगामी संघटनांचे निषेध आंदोलन.

आज दिनांक 19/ 12/ 2019 रोजी अहमदनगर येथे नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.आज संपूर्ण देशभरामध्ये नागरिकता सुधार कायदा (कॅब) व एनआरसी’ विरोधात सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज राष्ट्रीय कॉल दिलेला होता.त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुख्य बसस्थानकाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, देशाला विभागणार्या या जनहित विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी शहरातील सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने जमले होते.यावेळी विविध पक्ष व संघटनेच्या मान्यवरांची भाषणे झाली.आज संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या या ‘कॅब आणि एनआरसी’ विरोधातील आंदोलनाला बदनाम करण्यासाठी मोदी-शहा ची जोडी आणि मोदी मीडिया कामास लागलेले दिसून येत आहेत. यावेळी या निषेध आंदोलनामध्ये भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे संदीप सकट,शंकर, दिशा विद्यार्थी संघटनेचे अविनाश साठे, अपेक्षा साळवे, नौजवान भारत सभेच्या वतीने प्रवीण सोनवणे, अजिंक्य नवगिरे, नवगिरे मामी इ. सहभागी झाले होते. यावेळी नौभास च्या वतीने प्रवीण सोनवणे यांनी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले कि गेल्या सहा वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप आणि मोदीेचे सरकार सपशेल नालायक ठरले आहे. अच्छे दिनाच्या नावाखाली त्यांनी महागाई, बेरोजगारी, उपासमार इत्यादींसारखे प्रश्न वाढवून ठेवलेले आहे आणि या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात जनतेने प्रश्न विचारू नयेत म्हणून राम मंदिर आणि नागरिकता संशोधन विधेयक (कॅब) यासारखे मुद्दे काढून लोकांना विभागून टाकण्याचे काम भाजप सरकार करत आहे. जनतेने हे षडयंत्र ओळखले पाहिजे.आज 19 डिसेंबर काकोरी कटातील शहिदांचा स्मृतिदिन.शहिद अश्पाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांना याच दिवशी इंग्रजांनी फासावर चढवले होते. या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळी मध्ये हिंदू-मुस्लिम आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी योगदान दिलेले आहे, प्रसंगी हौतात्म्य ही पत्करलेले आहे;परंतु फासीवादी रास्वस संघ आणि भाजपाचे सरकार संपूर्ण देशभरातील लोकांना जात आणि धर्मामध्ये विभागून टाकण्याचे काम करत आहे.आज खरे तर अशा प्रकारचे कायदे हे फक्त मुस्लिमांनाच टार्गेट करणारें असून यामध्ये प्रामुख्याने सर्वच गरीब कामगार कष्टकरी भरडले जाणार आहेत कारण त्यांच्याकडे सादर करण्यासाठी कुठलेही पुरावे नसतील .अशा वेळी सर्व कामगार कष्टकरी यांनी या नागरिक सुधार कायद्याविरोधात एकजूट उभारत या जनहित विरोधी कायद्यांचा कडाडून विरोध केला पाहिजे आणि उरलेल्या बांधवांपर्यंत हा संदेश घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related posts

Leave a Comment

3 × 1 =