दि. 5/08/24 रोजी, केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून नौजवान भारत सभा अहमदनगरच्यावतीने सिद्धार्थनगर भागातील सिद्धार्थनगर झोपडपट्टी, मुन्सिपल कॉलनी व बोद्धवस्तीमध्ये अभियान चालविण्यात आले.
अभियाना दरम्यान पत्रक वितरण करण्यात आले तसेच 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे होत असलेल्या आंदोलनामधे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवण्यात आली व सहयोगही जमा करण्यात आला. अभियानाला लोकांचा प्रतिसाद चांगला होता.
आमच्या मागण्या:
1. एन.टी.ए.ला तत्काळ रद्द करुन परीक्षा आयोजनाची प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित केली जावी.
2. राज्यांत भरती आयोजित करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणाली त्वरित दोषमुक्त करण्यात याव्यात !
3. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रांतील पदांना तत्काळ दहापटीने वाढवण्यात यावे.
4. पेपरफुटी आणि भरती यांमध्ये भ्रष्टाचारासाठी दोषी असलेल्या व्यक्ती, अधिकारी, नेतेमंडळी यांच्यावर कठोर कलमं लावून गुन्हे दाखल करून त्यांना कठोरतम शिक्षा करण्यात यावी.
5. प्रश्नपत्रकांची छपाई खाजगी छापखान्यांमधून न करता सरकारी छपाईखान्यांमधून केली जावी.
6. परिक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे प्रभावीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन करून त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी.
7. केंद्र आणि राज्य विभागांतील रिक्त पदांना तत्काळ आणि ठराविक कालमर्यादेत भरण्यात यावे.
8. कंत्राटीकरण आणि जुजबीकरणावर रोख लावून सर्व कर्मचाऱ्यांना पक्के केले जावे.
9. सर्वांसाठी समान तसेच निःशुल्क शिक्षण आणि सर्वांसाठी रोजगाराची सोय करण्यात यावी.
10. ‘भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ पारित करण्यात यावा.
11. घटनादुरुस्ती करून शिक्षण-रोजगार-आरोग्य-निवासाला मूलभूत अधिकार बनवण्यात यावा.
नौजवान भारत सभा (अहमदनगर)
संपर्क: 7249590541, 9403317106
