महान जातिविरोधी योद्धा अय्यंकालींच्या १६१व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना क्रांतिकारी सलाम, नौजवान भारत सभा तर्फे साठेनगर, मानखुर्द च्या कामगार वस्तीत पोस्टरींग केले गेले

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आज अय्यंकालींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा वैचारिक वारसा आणि जतिविरोधी संघर्ष कामगार कष्टिकरी जनतेत घेऊन जाण्याच्या हेतूने नौजवान भारत सभा तर्फे साठेनगर, मानखुर्द च्या कामगार वस्तीत पोस्टरींग केले गेले.

अय्यंकालींनी ब्राह्मणवाद आणि त्यांच्या सत्तेपासून समानतेचा हक्क मिळवण्यासाठी एक संघर्षशील लढा दिला होता आणि यशस्वी झाले होते. अय्यंकाली अमूलगामी आणि संघर्षशील पद्धतीने रस्त्यावर उतरून लढाईचा मार्ग स्वीकारत असत. त्यांनी सरकारच्या कृपेवर किंवा समजुतीवर विश्वास ठेवला नाही, तर जनतेच्या पुढाकारावर विश्वास ठेवला. त्यांनी मानले की सरकार दलित आणि गरीबांच्या बाजूने नसते, तर शासक वर्गाचे प्रतिनिधित्व करते. त्यांनी सामाजिक सुधारणा मागितल्या किंवा अर्ज दिले नाहीत, तर त्यांनी रस्त्यावर उतरून ब्राह्मणवाद्यांच्या सत्तेला खुले आव्हान दिले आणि त्यांना पराभूत केले. अय्यंकालींच्या संघर्षाला स्मरून जातिव्यवस्थेच्या उन्मूलनाच्या आंदोलनाला सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या  चक्रातून बाहेर काढणे आवश्यक आहे.

जातिव्यवस्थेचा नाश होवो!
ब्राह्मणवादाचा नाश होवो! भांडवशाहीचा नाश होवो!
अय्यंकालींचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

fifteen + 3 =