काल चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान (२७ फेब्रुवारी) दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या सिद्धार्थनगर,अहमदनगर येथील शहीद भगतसिंह वाचनालयात कार्यक्रम घेण्यात आला.

 साथी अतुलने चंद्रशेखर आझाद यांच्या जिवन कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. चंद्रशेखर आझाद,भगतसिंह व त्यांच्या इतर साथीदारांनी ज्या धर्मनिरपेक्ष व समतापूर्ण समाजाचे स्वप्न पाहिले होते व त्याच साठी अतिशय कमी वयात देशासाठी बलिदान दिले होते ते स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष पूर्ण झाली तरीही आज आपण पाहतोय की बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतेय, महागाईने कळस गाठलाय, शिक्षणाचे खाजगीकरण वाढत आहे, कामगार कष्टकऱ्यांची अवस्था पूर्वीपेक्षा आणखीनच दयनीय होत आहे, धार्मिक तेढ वाढत आहे. शहिदांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. याची जाणीव करून देणारी आणि आद्योगिक क्षेत्रातील कामगारांची होणारी सततची पिळवणूक, मालकाच्या गडगंज नफ्यासाठी कामगारांना दिली जाणारी जनावरापेक्षाही वाईट वागणूक यावर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंटरी ‘ मौत ओर मायुसी के कारखाने ‘ दाखवण्यात आली. वस्तीतील मुला मुलींनी यात सहभाग नोंदवला. डॉक्युमेंटरी पाहून त्यावर झालेल्या चर्चेतही प्रत्येकाने आपली मते मांडत, प्रश्न विचारत गोष्टी अजून खोलात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सर्व समस्यांवर एकत्र येऊन काम करण्याचा म्हणजेच संघटित होण्याचा निर्धार केला.

Related posts

Leave a Comment

18 − fifteen =