27 फेब्रुवारी हा ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) चे आर्मी कमांडर इन चीफ शहीद चंद्रशेखर आझाद यांचा शहादत दिवस.

27 फेब्रुवारी हा ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) चे आर्मी कमांडर इन चीफ शहीद चंद्रशेखर आझाद यांचा शहादत दिवस. समाजवादाचे स्वप्न उराशी बाळगून देशात क्रांती घडवून आणण्याचा उद्देशाने साम्राज्यवादी इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना या क्रांतिकारकाने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पुण्यातील दांडेकर पूल भागात सर्व्हे क्र. 214 येथे नौजवान भारत सभेतर्फे चंद्रशेखर आझाद यांना शहादत दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी साथी रवि यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी बोलत असताना त्यांचे आयुष्य, स्वभाव, क्रांतिकारी कारवायांमधील सहभाग याबद्दल महिती दिली आणि क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांना संघटित होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता ‘मेरा रंग दे बसंती चोला’ गाण्याने झाली.

Related posts

Leave a Comment

3 × 3 =