नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “इंकलाब” माहितीपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!

“शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” अंतर्गत नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) मानखुर्द-गोवंडी, मुंबई येथील महाविद्यालयात दिनांक 30 सप्टेंबर रोजी गौहर रझा दिग्दर्शित ‘इंकलाब’ माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. ह्या माहितीपटात भगतसिंह आणि त्यांच्या साथींचा क्रांतिकारी जीवनप्रवास आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान अस्तित्वात असलेले विविध वैचारिक पैलू दाखवण्यात आले आहे. स्क्रिनिंगनंतर विद्यार्थ्यांसोबत भगतसिंहांच्या विचारांबद्दल आणि त्यांच्या स्वप्नांचा समाज निर्माण करण्यासाठी आज आपण काय करू शकतो, ह्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी नौभासच्या सांस्कृतिक पथकाने “मेरा रंग दे बसंती चोला” गीत प्रस्तुत केले आणि क्रांतिकारी साहित्याचा बुकस्टॉल सुद्धा लावण्यात आला. विद्यार्थ्यांचा ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

नौभासतर्फे असे अनेक उपक्रम पुढेही राबवले जातील. नौभाससोबत जोडून घ्या आणि एका समतामूलक समाजाच्या जडणघडणीत आपला सहभाग नोंदवा.

संपर्क: 7667230795, 9930095381
Gpay/UPI: shashanksaurav1995-2@okicici

Related posts

Leave a Comment

15 − fourteen =