नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक संगरूर, पंजाब येथे संपन्न!

मित्रांनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान संगरूर, पंजाब येथे पार पडली. बैठकीत संघटनेच्या तात्कालिक व दीर्घकालीन योजनांवर चर्चा करण्यात आली. ह्यासोबतच संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला गेला आणि विविध आव्हानांवर चर्चाही करण्यात आली. तसेच कष्टकरी जनतेच्या समस्यांवर प्रचारात्मक आणि आंदोलनात्मक अभियाने व सदस्यत्वाचा विस्तार सुनिश्चित करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला. भगतसिंहांचा क्रांतिकारक वारसा देशातील व्यापक तरुणांपर्यंत नव्या उत्साहाने आणि दृढनिश्चयाने पोहोचवण्याचे आणि त्यांच्यामध्ये संघटनेचा जनआधार वाढवण्याचे देखील ह्यावेळी ठरले. परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर् ठराव मंजूर करण्यात आले आणि विविध विषयांवर भूमिका देण्यात आल्या. सभासदांच्या नवीन ठरावांच्या मालिकेने बैठकीची सांगता झाली. केंद्रीय परिषद नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

20 + 11 =