निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!
गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या !
फॅसिस्ट गुंडागर्दी नाही चालणार!

 

आज 9 फेब्रुवारी 2024 रोजी “निर्भय बनो”च्या कार्यक्रमात भाषण द्यायला येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हला केला. या अगोदर पुण्यामध्ये “निर्भय बनो”ची सभा होऊ देणार नाही अशी धमकी भाजप पुणे शहर अध्यक्षांनी दिली होती. पोलिसांना याची सगळी कल्पना असतानाही हा हल्ला झाला. भाजपचे गुंडे पूर्ण तयारीनिशी काठ्या, मोठे दगड घेऊन आले होते आणि त्यांनी हल्ला केला.अजूनसुद्धा भाजपाच्या गुंडांना अटक करण्यात आलेली नाहीये. एकीकडे शांततेच्या मार्गाने होत असलेल्या आंदोलनांना पोलिस परवानगी नाकारतात तर दुसरीकडे अशा प्रकारचे हल्ले पोलिसांच्या समोर होतात आणि पोलिस फक्त बघत राहतात. भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा हल्ला पुणे पोलिसांच्या, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमताशिवाय शक्य नाहीये.
जेव्हापासून या देशात फॅसिस्ट सरकार सत्तेमध्ये आले आहे तेव्हापासून विरोधी विचारांचा प्रत्येक आवाज या देशात दाबून टाकण्यात येत आहे. फक्त पुण्यामध्ये गेल्या दोन आठवड्यातली ही तिसरी घटना आहे . नुकतेच एफ.टी.आय.आय. आणि ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. देशातील विद्यार्थ्यांवर, पत्रकारांवर, धार्मिक अल्पसंख्यांकांवर अशा प्रकारचे हल्ले होत आहेत. सामान्य जनतेच्या लोकशाही नागरी अधिकारांवर हिंदुत्ववादी हल्ले चढवत आहेत. अशा वेळेस हे समजणे गरजेचे आहे की निवडणुकांच्या मार्गे फॅसिझमला हरवणे कधीही शक्य होणार नाही. फॅसिझमला फक्त आणि फक्त सामान्य जनतेची वर्गीय एकजूटच उत्तर देऊ शकते.
हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस प्रशासनासोबत मिळून सुरू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा नौजवान भारत सभा तीव्र निषेध करते.

Related posts

Leave a Comment

20 − four =