मुक्तिबोध यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा प्रसिद्ध लेखाचे वाचन व चर्चा

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे सुरु असलेल्या साप्ताहिक अध्ययन चक्रात हिंदी साहित्यातील प्रमुख कवी, समीक्षक, निबंधकार, कथाकार आणि कादंबरीकार गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा प्रसिद्ध लेख ‘नौजवान का रास्ता’ चे वाचन व चर्चा करण्यात आली.
चर्चेच्या सुरवातीला सुप्रीथने मुक्तिबोध यांची ओळख मांडताना सांगितले की ते एक प्रगतिशील कवी आणि लेखक होते ज्यांनी न्यायाच्या पक्षात आपले लिखाण केले. चर्चेत पुढे मुक्तिबोधांनी लेखात मांडलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्थेचे खाजगीकरण यांचे आजच्या तरुणांच्या जीवनावरील परिणाम, समाजातील नियम, कायदे, रूढी, परंपरा इत्यादींकडे चिकित्सक वृत्तीने बघून योग्य तो पर्याय निवडण्याची किंवा योग्य पर्याय उभा करण्याची गरज इत्यादींवर चर्चा झाली.
तरुणांनी कसे असावे याबद्दल मुक्तिबोधांनी आपल्या लेखात खालील मुद्दे अधोरेखित केले :-
– तर्कशुद्ध विचार आणि कुतूहल, वस्तुस्थिती ओळखण्याची, त्यांना व्यवस्थित करण्याची आणि त्यातून निष्कर्ष काढण्याची शक्ती.
– अप्रामाणिकपणा, दुहेरी बोलणे, जबाबदारीचा अभाव – कनिष्ठता, आळशीपणा, शाब्दिक आदर्शवाद, गर्व, अहंकार इत्यादी प्रवृत्तींचा अभाव असावा.
– ज्ञान, सत्य, आत्मीयता, शिष्टाचार, प्रेम आणि त्याग यापुढे अविरत नम्रता.
– जनतेच्या संघर्षांच्या यशावर आत्मिक विश्वास, लोकांच्या सर्जनशील ऐतिहासिक शक्तींच्या विजयाचे स्वप्न.
– स्वतःच्या अनुभवांतून, इतरांच्या अनुभवांतून शिकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कोणतीही लाज न बाळगता जाहीरपणे स्वतःच्या चुका नम्रपणे मान्य करण्याची वृत्ती.
चर्चेत अनेकांनी मुक्तिबोधांच्या लेखनशैलीतील स्पष्टता, साहित्यिक अभिव्यक्ती, वेगळेपणा आकर्षक वाटतो असे मांडले.

Related posts

Leave a Comment

sixteen − 15 =