नौजवान भारत सभेतार्फे चालवण्यात येणाऱ्या शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकणाऱ्या मुलांसाठी पेशी (cell) ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले. पेशी म्हणजे काय, सर्वात पहिली पेशी, तिचा उगम, अमीबा, पेशीचे संरचना, वनस्पती पेशी, प्राणी पेशी, पेशीतील विविध भागांचे कार्य, इत्यादी संकल्पना ह्या व्याख्यानात समजावून सांगितल्या गेल्यात. विद्यार्थ्यांना देखील व्याख्यान आवडले. सोप्प्या पद्धतीने, गोष्टीच्या रुपात विषय मांडला म्हणून कळायला पण मदत झाली असं उपस्थित विद्यार्थ्यांचं मत होतं. ह्याच साखळीतील पुढील व्याख्यान घेण्याआधी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली गेली की त्यांना व्याख्यानात किंवा शिकवण्याच्या पद्धतीत काय त्रुटी वाटल्यात जेणेकरून पुढील वेळी त्या दुरुस्त करून अधिक सविस्तर आणि मुलांना गोडी निर्माण होईल अशा पद्धतीने विषय समजावून सांगता येईल.
विद्यमान शिक्षणपद्धती सामान्य कष्टकरी घरातील मुलांना विज्ञान, गणित, कला यांसारख्या विषयांपासून दूर नेत आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. अगदी साध्या संकल्पना सुद्धा मुलांना शिकवल्या जात नाहीत. अनेक मुलांना ह्या विषयांमध्ये रस असताना देखील शिकण्याची संधी उपलब्ध न झाल्याने, हे विषय काहीतरी आपल्या आकलनापल्ल्याड असल्याचं मुलांना वाटू लागतं. म्हणूनच सर्वांना केजी टू पीजी सामान, निःशुल्क आणि दर्जेदार शिक्षणाची मागणी उचलत नौजवान भारत सभा कष्टकरी वस्त्यांमध्ये गणित, विज्ञान, कला, विविध भाषा इत्यादी विषय रसपूर्ण, नावीन्यपूर्ण, अधिक उन्नत पद्धतीने घेऊन जाण्यास स्वतःस प्रतीबद्ध मानते. ज्ञान ही सामाजिक संपत्ती आहे आणि समाजात तिला प्रवाहित ठेवले नाही तर ते थिजेल, कुजेल, समजाला काही नवीन, अधिक प्रगल्भ काही देण्याची क्षमता गमावून बसेल. त्यामुळे समाजाकडून आपल्याला मिळालेलं ज्ञान पुन्हा समाजाकडे देऊन त्याला सतत प्रवाहित ठेवणे आपले कर्तव्य आहे.
नौजवान भारत सभा सर्व न्यायप्रिय, धैर्यवान युवक – युवतींना शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिक्षक स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी आवाहन करत आहे.
संपर्क :- 7667230795
