शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानांतर्गत “काफिला-ए-इंकलाब” चे आयोजन!

शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेकडून देशभरात शहीद स्मृती संकल्प अभियान चालविण्यात आले होते. मुंबईत या अभियानाची सांगता काल “काफिला-ए-इंकलाब” रॅलीने झाली. मागील 10 दिवसांत शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे समाज परिवर्तनाचे विचार आजच्या विद्यार्थी-तरूण पिढीत रुजवण्याच्या हेतूने मानखुर्द-गोवंडी मधील शाळा महाविद्यालयांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. ज्यात शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित इंकलाब नावाचा माहितीपट, गाणी, नाटक सादरीकरण, पुस्तक प्रदर्शने लावण्यात आलीत.
अभियानाच्या शेवटच्या दिवशी “काफिला-ए-इंकलाब” रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली मानखुर्दच्या कामगार वस्तीमधून काढण्यात आली. यादरम्यान “राजा का बाजा” हे नाटक सादर करण्यात आले तसेच सभा, क्रांतिकारी गीत सादर केले गेले, पत्रके वाटण्यात आलीत.
यादरम्यान सूत्रसंचालन नौभास सदस्य शशांक यांनी केले. धनंजय आणि सोहम यांनी भगतसिंह यांचे जीवनकार्य तसेच त्यांच्या विचारांची आजची प्रासंगिकता यावर मांडणी केली. शारोन यांनी नौभास मुंबईत करत असलेल्या कामाचे स्वरूप सांगत युवकांना संघटनेशी जोडून घेण्याचे आवाहन केले. रॅली दरम्यान जनतेशी संवाद साधण्यात आला, त्यांना शहीद-ए-आझम भगतसिहांचा जन्मदिवस साजरा करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता ‘आ रे नौजवान’ या क्रांतिकारी गाण्याने झाली.
भगतसिंहांच्या स्वप्नांना
साकार करा, साकार करा!
इंकलाब जिंदाबाद!!
नौजवान भारत सभा, मुंबई

Related posts

Leave a Comment

5 × 2 =