आंबिल ओढा नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आज दांडेकर पूल भागातील पानमळा, बावन्न चाळ आणि रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये एस. आर. ए‌. च्या प्रश्नाबद्दल कामगार कष्टकरी जनतेमध्ये भाषण देत आणि पत्रकं वाटत अभियान राबविले

आंबिल ओढा नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आज दांडेकर पूल भागातील पानमळा, बावन्न चाळ आणि रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये एस. आर. ए‌. च्या प्रश्नाबद्दल कामगार कष्टकरी जनतेमध्ये भाषण देत आणि पत्रकं वाटत अभियान राबविले. बुधवारी, ११ तारखेला सकाळी १० वाजता आयोजित घराच्या हक्कासाठी दांडेकर पूल परिसरातील नागरिकांच्या एकता प्रदर्शन आंदोलनात परिसरातील कामगार कष्टकरी बंधूंनी आणि भगिनींनी सामिल व्हावं म्हणून देखील प्रचार केला गेला त्याच बरोबर जागोजागी पोस्टर लावण्यात आले. या अभियानांत आंबिल ओढा वस्ती मधील नागरिक देखील सक्रिय सहभागी झाले होते. समिती व नौभास आपल्या कामगार कष्टकरी सहकाऱ्यांना आणि तमाम न्यायप्रिय व्यक्तींना एकता प्रदर्शन आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करत आहे.

Related posts

Leave a Comment

18 + ten =