काल, 9 ऑगस्ट रोजी काकोरी ऍक्शन प्लॅन दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बिबवेवाडीच्या सुप्पर येथील दुर्गामाता गार्डन येथे नौजवान भारत सभेकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.काकोरी ऍक्शन प्लॅन व हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीच्या क्रांतिकारी वारश्यावर चर्चा झाली. शहीद क्रांतिकारकांचे शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट आजही पूर्ण झालेले नाही, व आज देखील तरुणांना ह्याच उद्दिष्टाने संघटित होण्याची गरज आहे. तसेच आजच्या सर्वांगीण कोंडीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ऑगस्ट क्रांती सारख्या कामगार-कष्टकऱ्यांच्या जनऊठावातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा कामगार-कष्टकऱ्यांना एकजूट करावे लागेल असे नौजवान भारत सभेचे साथी सुस्मित ह्यांनी मांडले.
ह्यानंतर साथी निमिष ह्यांनी नौजवान भारत सभेचे लक्ष, उद्दिष्ट, कार्यक्रम, व आजवरील उल्लेखनीय काम थोडक्यात मांडले.
वस्तीतील तरुणांची आजची वस्तुस्थिती, कामगार-कष्टकऱ्यांची परिस्थिती, आणि नौजवान भारत सभेची आगामी कार्यदिशा ह्यांवर ह्यानंतर चर्चा झाली. ही अंधारमय परिस्थिती बदलण्यासाठी एकत्र येण्याचा चर्चेतील सर्व साथींनी उत्साहाने निश्चय केला.
