शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने फिल्म स्क्रिनिंग…

दि.24/08/2021 रोजी नौभास आणि स्त्री मुक्ती लीग (मुंबई) ह्यांच्या द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त साठेनगर, खाडी (मानखुर्द) येथे ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटाचे फिल्म स्क्रिनिंग करण्यात आले.

चित्रपटाच्या सुरुवातीला मांडणी करत सांगण्यात आले की, शहीद राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना जसा स्वतंत्र भारत अपेक्षित होता आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट स्वतंत्र असेल, त्यामुळे मूठभर इंग्रज निघून जातील आणि भारतीय भांडवलदार, उद्योगपतींचे राज्य येईल आणि स्वतंत्र्या नंतर देखील हे शोषणाचा तंत्र याच पद्धतीने चालू राहील. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यासाठी त्यांनी क्रांतिकारी मार्ग निवडला होता.

आज देशांतील परिस्थिती क्रांतीकारकांच्या या शब्दाची मिळती-जुळती आहे. 1.00% टक्के लोकांकडे 73.00% टक्के संपत्ती जमा झाली आहे. तर 10.00% टक्के लोकांकडे 85.00% टक्के संपत्ती जमा झाली आहे. यावरून हे कळते की श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय आहे आणि गरीब हा गरीबच होत चालला आहे.

जातीधर्माच्या नावाखाली आज प्रत्येक दिवसाला कित्येकांच्या हत्या केल्या जातात. कितेक आरोपी निर्दोष सुटतात. तरीसुद्धा सांप्रदायिकतेचे विष पसरवणारा संघ परिवार व त्याच्या सहयोगी संघटना समाजामध्ये विभाजन करणारे राजकारण सातत्याने करत आहेत. तर प्रत्येक दिवसाला जनतेला थोड्याफार प्रमाणात दिलासा देणारे कायदे बदलले जात आहेत.

आज घडीला देशात कोरोना माहामारिनंतर शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, उपासमारी अशा अनेक समस्यांना कष्टकरी जनता प्रत्येक दिवसाला तोंड देत आहे. आज अशा परिस्थितीमध्ये शहीद क्रांतिकारी राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव अशा तमाम क्रांतिकारकांचा वारसा घेऊन सांप्रदायिक फासीवादी बीजेपी, आरएसएस व इतर सर्व संघटना बरोबर येणाऱ्या काळात मुकाबला केला जाऊ शकतो. यासाठी पुन्हा एकदा नव्याने क्रांतिकारकांच्या विचारांचा जागर करत क्रांतिकारकांनी दाखवलेल्या मार्गाने त्याग, निष्ठा व समर्पित भावनेने जनतेला एकजुट होण्याचा संकल्प करण्याचे आव्हान करण्यात आले.

 

Related posts

Leave a Comment

16 + two =