शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत रफिक नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले.
नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील रफिक नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है – प्रस्तुती करण्यात आली. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला.


