महा विद्रोही राहुल सांकृतायान यांच्या जन्मदिवस (9 एप्रिल) व स्मृतिदिनािमित्त (14 एप्रिल) नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चर्चा सत्र घेण्यात आले.

चर्चा सत्रात प्रथमत राहुल सांकृतायान यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला व नंतर त्यांनी लिहिलेला ‘ तुमच्या समाजाचा ह्रास’ हा लेख वाचून त्यावर चर्चा करण्यात आली. आज घराघरात परिचित असावी अशी ही व्यक्ती असून देखील भांडवली व्यवस्थेसाठी त्यांचे विचार घातक असल्याने भांडवली विचारधारेचा प्रचार प्रसार करणाऱ्या संपूर्ण प्रणालीने त्यांना घराघरात पोहचू दिले नाही. आज समाजात धार्मिक, जातीय द्वेष पसरवण्याचे काम युद्धस्तरावर होत असतांना, तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली असतांना, श्रीमंत – गरीब दरी दिवसेंदिवस वाढत असतांना, गरीब – कष्टकरी जनतेचे अतोनात हाल होत असतांना राहुल सांकृतायान यांचे विचार समाजाला सत्याचा आरसा दाखवून जाती धर्माचे पाश तोडत कामगार वर्गीय चेतनेच्या आधारे एकजूट होण्याचे आवाहन करतात.

चर्चा सत्रात सहभागी असलेल्या शाहीन, माधुरी, पूजा एस. यांनी मांडले की यापूर्वी राहुल सांकृतायान बद्दल काहीच माहीत नव्हते. आज त्यांच्या बद्दल जाणून घेतल्यानंतर, त्यांनी लिहिलेला लेख वाचल्यानंतर त्यांचे इतर लिखाण वाचण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे पण त्या बरोबरच ही निकड भासत आहेत की ज्या सोप्प्या, समजेल अश्या शैलीत त्यांनी लिहिले आहे ते घराघरात पोहचलेच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून नजीकच्या काळात काही उपक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. चर्चेत रवि, शारोन, संजीव, पूजा, शाहीन, माधुरी, पूजा एस. सहभागी होते.

Related posts

Leave a Comment

5 × one =