नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन!

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन! 23 मार्च, शहीद दिवस, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगतसिंह, सुखदेव राजगुरू देशासाठी शहीद झाले होते.  त्याच्या स्मरणार्थ अणि त्यांचा क्रांतिकारी वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नौजवान भारत सभा,  मुंबई ने शहीद स्मृती संकल्प अभियान यशस्वीरीत्या पार पाडले. ही रॅली मानखुर्द च्या कामगार वस्त्यांमधून काढण्यात आली. रॅलीची सुरवात पीएमजीपीच्या बाजारातून झाली.  सुरवातीलाच क्रांतिकारी घोषणांनी पीएमजीपी चा बाजार दणाणून निघाला. रॅलीदरम्यान पत्रके, भाषण अणि क्रांतिकारी गीते गायली गेली. आपल्या भाषणातून नौभासच्या सदस्यांनी भगतसिंह…