‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन

‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन दि. 22 मार्च रोजी मानखुर्द-गोवंडी भागातील शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर इलाक्यात पुस्तक प्रदर्शन आणि पोस्टरिंग आयोजित करण्यात आले.  अभियानादरम्यान पत्रक वाटप करत विद्यार्थी, युवक आणि कामकरी जनतेमध्ये भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा क्रांतिकारी वारशाचा महत्व अधोरेखित करण्यात आले.  या अभियानाला जनतेमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी नौजवान भारत सभा बद्दल जाणून घेण्याची इच्छा दर्शवली. आपल्या क्रांतिकारकांचे विचार जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही पुढे देखील असे अभियान नियमितपणे आयोजित करू. शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी, संपर्क: 7667230795

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर  नौजवान भारत सभाच्या वतीने शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहादत दिनानिमित्त (23 मार्च) तीन दिवसीय “शहीद स्मृती संकल्प अभियान” आयोजित करण्यात आले. हे अभियान शहरातील विविध भागांत राबवण्यात आले, ज्यामध्ये ‘बाईचीच चूक’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाच्या माध्यमातून शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान तसेच त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवला गेला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती नव्हते, तर त्यांचा…

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त – चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त – चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम दि. 23 मार्च, अहिल्यानगर – नौजवान भारत सभेच्या वतीने शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त सिद्धार्थनगर येथे चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “भगतसिंह तू जिंदा है” आणि “आरे नौजवान” या क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली. त्यानंतर साथी सायली हिने कार्यक्रमाच्या उद्देशाची आणि भूमिका स्पष्ट करत प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान “बाईचीच चू क” या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर साथी अतुल यांनी “शहीदांचा वैचारिक वारसा आणि आजच्या काळातील प्रासंगिकता” या…

23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन!

शहीद क्रांतिकारकांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद! शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू अमर रहे! 23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन! आज 23 मार्च. आजच्याच दिवशी ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेने भारतीय क्रांतीचे अग्रदूत असणाऱ्या भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना फाशी देऊन भारतीय क्रांतिकारी आंदोलनाची अपरिमित हानी केली होती. जगभरातील क्रांतिकारी आंदोलनातून आणि रशियात झालेल्या महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीतून प्रेरणा घेत या क्रांतिकारकांनी भारतीय जनतेला ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मात्र भारतीय जनतेला ब्रिटिश गुलामीतून…