पॅलेस्टिनी जनतेचा स्वातंत्र्यलढा जिंदाबाद!

रविवार 2 जून, 2024
नौजवान भारत सभा आणि इतर न्यायप्रिय संघटनांनी मिळून झायनवादी, सेटलर वसाहतिक इस्रायल आणि साम्राज्यवादी अमेरिकेविरोधात अणि पॅलेस्टाईनच्या जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनात पुण्यातील आंबेडकर पुतळ्याजवळ लाक्षणिक निदर्शने केली. पॅलेस्टाईनच्या राफा शहरावर, जिथे निर्वासितांच्या छावण्या होत्या तिथे सुद्धा २६ मे पासून इस्रायलने हल्ला सुरू केला असून दररोज नरसंहार सुरू आहे, सामान्य जनतेवर बॉम्बचा वर्षाव करून नृशंस कत्तली केल्या जात आहेत, ज्यात लहान मुलांचासुद्धा समावेश आहे.
नौभासतर्फे साथी सुस्मित यांनी मांडले की मागच्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईनचे 36000 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये सर्व शाळा, कॉलेज, दवाखाने, घरं उद्ध्वस्त करण्याचे पूर्ण प्रयत्न इस्रायल करत आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आणि युनायटेड नेशन्सच्या युद्धबंदीच्या निर्णयाला न जुमानता इस्रायल अमेरिकी शस्त्रास्त्र आणि भांडवलाच्या सहय्याने पॅलेस्टाईनच्या जनतेला मुंग्यांप्रमाणे चिरडून टाकत आहे. इस्रायलविरोधात कोणतेच देश कठोर भूमिका घेताना दिसत नाहीत, कारण ह्या देशांतली सरकारं भांडवलदारांचे सामूहिक हित जपत आहेत.
76 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनच्या जमिनीवर इस्रायलची स्थापणा केली आणि तेव्हापासूनच पॅलेस्टाईनचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. जमीन बळकावण्यासाठी आणि मध्यपूर्वेत पाश्चिमात्य साम्राज्यवादी शक्तींचे नियंत्रण ठेवण्यासाठी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या जनतेच्या अमानुष हत्या केल्या आहेत. परंतू अजूनही पॅलेस्टाईनच्या जनतेने हार मानलेली नाही आणि ते लढत राहतील यात दूमत नाही. धर्माच्या अधारावर नाही तर एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राची स्थापणा, जिथे सर्व धर्मिय लोक एकत्र राहतील, हीच योग्य मागणी आज आपण पॅलेस्टाईनसाठी केली पाहिजे. जगभरातील अनेक देशांमध्ये विद्यार्थी-तरुण रस्त्यांवर एकत्र येत आहेत आणि पोलिसांच्या दमनाला न जुमानता पॅलेस्टाईनला समर्थन देत आहेत. भारतातील विद्यार्थी-तरुणांचे सुद्धा हे कर्तव्य आहे की या नरसंहाराच्या विरोधात सामान्य, कष्टकरी आणि न्यायप्रिय जनतेला संघटित करून धर्मवादी भाजप सरकारवर झायनवादी युद्धखोर इस्रायलविरोधात कठोर पाऊले उचलण्यासाठी दबाव बनवला पाहिजे, असे आपल्या वक्तव्याच्या शेवटी साथी सुस्मित यांनी मांडले.
गाझावरील हल्ला थांबलाच पाहिजे!!
वसाहतवादी इस्राईल मुर्दाबाद!
झायनवाद मुर्दाबाद!
नेत्यान्याहू मुर्दाबाद!
जो बिडेन मुर्दाबाद!
पॅलेस्टिनी जनतेचा स्वातंत्र्यलढा जिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

five × 4 =