✊✊✊ *जाती-धर्म नही बटेंगे, मिलजूल कर संघर्ष करेंगे!* अहमदनगर मध्ये सीएए, एनआरसी,एनपीआर विरोधात जनजागृती सभा रविवार दिनांक 15/3/2020 रोजी नौजवान भारत सभा व संविधान बचाव जन आंदोलनाच्या वतीने CAA,NRC,NPR या गरीबविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात बाराइमाम कोटला, (इमामबाड़ा) अहमदनगर येथे जनजागृती अभियान चालविण्यात आले.यावेळी बोलताना संविधान बचाव जनआंदोलनाचे युनूस भाई तांबटकर म्हणाले की, सरकारला जर विदेशी नागरिकांना बाहेर काढायचे आहे तर त्यांनी खुशाल बाहेर काढावे, परंतु त्यासाठी संपूर्ण देशातील जनतेला लाईनमध्ये लावण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित केला. शेवटी त्यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले, की या काळ्या कायद्याच्या विरोधात येत्या 20,21व 22 मार्च रोजी लाल टाकी, अहमदनगर येथे होत असलेल्या शाहीन बाग आंदोलन होणार असून आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यानंतर नौभासचे साथी प्रविण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की आज संपूर्ण देशामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आत्महत्या विद्यार्थी, बेरोजगारांच्या आत्महत्या, कुपोषण,भूकबळी, मंदी इत्यादी प्रश्नांनी थैमान घातलेले आहे.देशातील जनता जर या प्रश्नांच्या विरोधात रस्त्यावर उतरली तर सरकार कोंडीत सापडेल. या मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठीच भाजपच्या फासीवादी सरकारने सीएए, एनआरसी,एनपीआर मार्फत जनतेला देशी-विदेशी मध्ये विभागून टाकण्याचे षड्यंत्र रचले आहे. या प्रश्नांना सोडविण्यासाठी सरकारकडे कुठलीही योजना नाहीये. देशातील जनतेने हे षड्यंत्र ओळखून 1मे पासून होणाऱ्या सर्व्हे अंतर्गत कोणतीही माहिती न देता सविनय कायदेभंग केला पाहिजे. यावेळी तानाशाह आ कर जायेंगे,हम कागज नही दिखायेंगे।, अश्पाक-बिस्मिल का संदेश, हिंदू-मुस्लीम सबका देश।,जाती-धर्म में नही बटेंगे, मिलजूल कर संघर्ष करेंगे। या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शेवटी या काळ्या कायद्याच्या विरोधात दिल्ली, कलकत्ता, पश्चिम बंगाल प्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा एनपीआर,एनआरसी व सीएए विरोधात ठराव पास करावा, यासाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली .यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अहमदनगर मध्ये सीएए, एनआरसी,एनपीआर विरोधात जनजागृती सभा
