आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली.

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली. दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात एक अभियान चालवण्यासाठी त्यांनी एक ‘टूलकीट’ बनवली होती. ही टूलकीट इंटरनेटवर उपलब्ध आहे. या टूलकीट मध्ये हिंसाचाराबद्दल अवाक्षरही नाही. सोशल मिडीय़ा अभियान चालवण्यासाठी अशाप्रकारच्या टूलकीट बनवण्याची पद्धत अनेक संघटना अवलंबत असतात. भाजपच्या सोशल मिडीया सेलचे कामही असेच चालते. तरीही दिशा रवी यांच्यावर त्या देशविरोधी काम करत असल्याचे खोटे आरोप करत राजद्रोहाचा खटला भरला गेला आहे. त्यांचे साथीदार शंतनू आणि निकिता यांच्याही अटकेचे प्रयत्न पोलिस करत होते, पण उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारचे पितळ उघडे पाडणाऱ्या बातम्या देणाऱ्या विविध प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांपासून, राजकीय विरोधकांपासून ते मानवाधिकार कार्यकर्त्यांवर सतत राजद्रोहाचे खटले दाखल केले गेले आहेत. रोना विल्सन प्रकरणात तर खोटे पुरावे पेरल्याचे सुद्धा उघडकीस आले आहे. अशा सर्व लोकशाही अधिकारांच्या दमना विरोधातील भुमिकेतून आजची निदर्शने केली गेली. शेतकरी आंदोलन, फ़्रायडेज फॉर फ़्युचर वा भीमा कोरेगाव सारखे कार्यक्रम यांच्या भुमिकांशी नौभास चे मतभेद असले तरी त्यांच्या लोकशाही अधिकारांच्या समर्थनात आम्ही उभे आहोत आणि आज आपण सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. लोकशाही अधिकारांवर घाला घालू पाहणारे फॅसिस्ट भाजप सरकार राजद्रोहासारख्या काळ्या कायद्यांचा सर्रास गैरवापर करून जनपक्षधर कार्यकर्त्यांचा आवाज दडपू पहात आहे. रवी पुर्णे 8956840785, डॉ निखिल 99705 76130 (नौजवान भारत सभा, पुणे)

Related posts

Leave a Comment

sixteen − thirteen =