दिल्लीत आपल्या मानधन, पक्का रोजगार, इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी महिला मागील 19 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे साथी सिमरन यांनी मांडले की भगतसिंहांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य ते आहे ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माणाची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी असेल. अंगणवाडी महिलांचा हा क्रांतिकारी लढा त्याच स्वप्नपूर्तीच्या मार्गातील एक मैलाचा दगड आहे. कामगार – कष्टकऱ्यांच्या न्याय्य लढ्यासोबत उभे राहणे नौजवान भारत सभा आपले कर्तव्य मानते. ज्या एकजुटतेचे प्रदर्शन करत संघर्षरत महिला हा संप चालवत आहेत त्याची दखल संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. केजरीवाल सरकारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांपुढे झुकावेच लागेल. ह्या संघर्षात नौजवान भारत सभा, मुंबई पूर्णतः दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स युनियनच्या सोबत आहे.
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स युनियन च्या संपाला पाठिंबा
