हातरस येथील क्रूर बलात्काराच्या विरोधात मानखुर्द – गोवंडी (मुंबई) येथे विरोध प्रदर्शन

दि.३०/०९/२०२० रोजी हातरस येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि पोलिसांच्या (जंगलराज) विरोधात आंदोलनं होत आहेत.
उत्तर प्रदेशातील ‘योगी’ राज मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तसेच दलितांवरील अन्याय – अत्याचारांच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १४सप्टेंबर रोजी हातरस येथील मनीषा वाल्मिकी (वय १९) या दलित मुलीवर सवर्ण जातीतील ४ नराधमांनी  सामूहिक बलात्कार केला व त्यानंतर तिने त्यांची नावं सांगू नयेत म्हणून तिची जीभ कापण्यात आली, तिच्या पाठीचा कणा मानेतून मोडून टाकला गेला. एवढ्या भयंकर पध्दतीने त्या मुलीवर बलात्कार केल्यावर जेव्हा तिचे आई – वडील, भाऊ पोलिसांकडे तक्रार दाखल कण्यासाठी केले तेव्हा त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात येत नव्हती आणि घेतली तरी त्यात बलात्कार आणि जीभ कापण्याच्या बाबीला लपवण्यात येत होते. हा सर्व प्रकार पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी केला जात होता. याच दरम्यान गंभीर अवस्थेत असलेल्या मनीषा वाल्मिकी या पीडित मुलीकडे पोलिसांनी हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे पीडित मुलीला २९ सप्टेंबर रोजी जीव गमवावा लागला.
आपल्याला माहीतच असेल की महिला अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेश देशात सर्वात पुढे आहे तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी बलात्कार आणि अन्याय अत्याचार करण्याच्या समर्थनात बीजेपी चे नेते आणि कार्यकर्ते आरोपी नराधमांच्या बाजून उभे राहून तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्याचे देखील उदाहरणे आहेत. त्यासाठी चिन्मयानंद बलात्कार प्रकरण, कठुआ बलात्कार प्रकरण, असिफा या ८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना आपल्या समोर आल्या आहेत. या सर्वच प्रकरणात बीजेपी आरोपींना वाचवण्यासाठी पीडितांच्या हत्या करायला देखील मागे राहिले नाही. बऱ्याच ठिकाणी तर आरोपीच्या बाजूने उभे राहण्याचे कारण हे होते की, आरोपी हा “हिंदू” आहे आणि पीडित ही मुस्लिम किंवा दलित आहे.
अशात आज आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे की, वर्तमान व्यवस्थेत मुळापासून बदल केल्या शिवाय अशा अमानवीय घटनां पासून सुटका मिळू शकत नाही. वर्तमान भांडवली आणि पुरुषसत्ताक व्यवस्था महिलांना एक माल किंवा फक्त उपभोगाची वस्तू समजत असतात. त्यामुळे भांडवलशाही आणि पुरुषसत्ताक व्यवस्था आणि मानसिकता या विरुद्ध आज आपल्याला निर्णायक लढा उभारावा लागेल तेव्हां आपण या अमानवीय प्रवृत्तीवर निर्णायक विजय मिळवून खऱ्या अर्थाने स्त्री – पुरुष समानता समाजात प्रस्थापित स्थापित करू शकू.
हातरस बलात्कार प्रकरणातील आरोपी मुर्दाबाद!
योगी – मोदी फासिस्ट सरकार मुर्दाबाद
स्त्री मुक्ती लीग
नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

fifteen + two =