महाराष्ट्रातून नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग चे कुस्ती पहिलवानांच्या आंदोलनाला समर्थन.

भाजप सरकारचा मंत्री बृजभूषण शरण सिंग च्या विरोधात गेले 20 दिवस कुस्ती पहिलवानांचे आंदोलन सुरू आहे. बृजभुषण वर महिला कुस्ती खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कुस्ती खेळाडूंनी लावला आहे आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर बृजभुषण वर FIR झाली आहे. परंतू FIR केल्याचा बऱ्याच दिवसांनंतर सुद्धा दिल्ली पोलीस पुढील कारवाई करण्यास टाळत आहेत.
आज नौजवान भारत सभा, महाराष्ट्र टीमने दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग सोबत दिल्ली च्या जंतर -मंतर मैदानात जाऊन पहिलवानांच्या संघर्षाचे समर्थन केले. भाषणात सांगितले गेले की मुंबई-पुण्यात त्यांच्या समर्थनात मोर्चे काढले गेले आहेत आणि सामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सामान्य जनता त्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहे आणि त्यांच्या सोबत आहे. पुढेही आम्ही त्यांच्या संघर्षात सोबत आहोत आणि इथून परत गेल्यावर पहिलवानांचा संघर्ष महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये घेऊन जाऊ असे आश्वासन पहिलवानांना दिले गेले.

Related posts

Leave a Comment

4 × 4 =