आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात नौजवान भारत सभेच्या वतीने दिल्लीगेट, अहमदनगर येथे निदर्शने

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात नौजवान भारत सभेच्या वतीने दिल्लीगेट, अहमदनगर येथे निदर्शने
23 एप्रिल पासून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांद्वारे 28 मे रोजी अमानवीय पद्धतींनी मोडून काढण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर मध्ये 31 मे रोजी नौभास तर्फे आंदोलन केले गेले.
भाजपचा गुंड खासदार व कुस्ती संघाचा अध्यक्ष ब्रुजभूषण सिंह याच्यावर आतापर्यंत असंख्य महिला कुस्ती पहिलवानांनी लैंगिक शोषण करण्याचा आरोप केला आहे. ज्यात एका अल्पवयीन मुलीचा देखील आरोप ब्रुजभूषण वर आहे. त्याच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्ती खेळाडूंची धर पकड करत रस्त्यात फरफटत, जबरदस्तीने पकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दिल्ली पोलिसांनी दाखल केले आहेत. जंतर मंतर येथे त्यांच्या आंदोलनाची जागा सुद्धा उद्ध्वस्त करून टाकत समर्थकांना दिल्ली पोलिसांनी काही काळ अटक देखील केली. कुस्ती खेळाडूंनी सरकारला पुढील पाच दिवसात ब्रुजभूषण सिंह यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नाहीतर त्यांनी देशाकरता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकलेले मेडल्स गंगा मध्ये विसर्जित करण्याच्या आणि आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.
निदर्शनावेळी नौजवान भारत सभेचे साथी अतुल यानी आपल्या भाषणामध्ये मांडले की बेटी पढाव,बेटी बचाव चा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात खरच महिला सुरक्षित आहेत का? जर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदके मिळवणाऱ्या महिला पहिलवांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात न्याय मिळवण्यासाठी रस्तावर उतराव लागत असेल.तर सर्व सामान्य महिलांची काय अवस्था असेल. यावरून भाजप सरकारचे स्त्री विरोधी चरित्र जनतेसमोर उघड होते. देश भरात भाजपचे असंख्य मंत्री असे आहेत. ज्यांच्या विरुद्ध स्त्री विरोधी गुन्हे दाखल आहेत. 20 मंत्री असे आहेत ज्यांच्या विरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. ब्रुजभूषण सिंहच्या विरुद्ध 40 गुन्हे दाखल आहेत. ज्यात खून, दंगली भडकवणे, इत्यादी सारखे गंभीर गुन्हे सुद्धा आहेत. हे स्पष्ट आहे की ब्रिजभूषण ला वाचवण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे.

Related posts

Leave a Comment

5 − two =