

133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले.
यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पान मळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील किशोर कांबळे, शाहू वसाहत येथील साधू नवाडे, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे (RWPI) परमेश्वर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व वस्त्यांमधील प्रतिनिधींनी मांडले की माहिती लपवून, लोकांना विश्वासात न घेता ओढ्याचा मार्ग बदलण्याचे काम चालू आहे आणि लोकांना अंधारात ठेवून सक्तीने विस्थापन केले जात आहे. प्रत्येकच वसाहतीतील प्रकल्पाबद्दल कोणतीही पारदर्शकता दाखवली जात नाही आणि लोकांमध्ये फूट पाडून पात्र-अपात्रचा भेद वापरून बिल्डर आपला फायदा वाढवत आहेत. काही वसाहतींमध्ये सक्तीने नागरिकांच्या सह्या घेऊन प्रकल्प लादण्याचे प्रयत्न चालू आहेत, असेही समोर आले. RWPI तर्फे पाठिंबा देत कॉम्रेड परमेश्वर जाधव यांनी मांडले की फक्त कामगार वर्गीय पक्षच घरकुलांचा अधिकार खऱ्या अर्थाने सर्वांना देऊ शकतो, जेव्हा की भांडवली पक्षांचे कामच कामगार वर्गात फूट पाडून बिल्डर-भांडवलदारांचे हित साधणे, आणि कामगार-कष्टकऱ्यांना अधिकार डावलणे हे आहे.
नौजवान भारत सभेतर्फे रवी पुर्णे यांनी आपले मत व्यक्त करताना मांडले की सर्व भांडवली पक्ष बिल्डरधार्जीणेच आहेत आणि बिल्डरांचा नफा वाढवण्याकरिता नेहमीच पात्र-अपात्रचा खेळ खेळला जातो, जेव्हा की मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पात्र मानणे आणि सर्वांना घर पुरवणे ही शासनाची जबाबदारी असली पाहिजे. आपसात जातींमध्ये न विभागता, भांडवली पक्षांच्या प्रलोभनांना न भुलता आपली एकता टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
आंदोलनातर्फे खालील मागण्या मांडण्यात आल्या:
