सर्वात धोकादायक
मेहनतीची लूट सर्वात धोकादायक नसते
पोलिसी दमन सर्वात धोकादायक नसते
गद्दारी, लोभाची लालूच सर्वात धोकादायक नसते
बसल्या-बसल्या पकडले जाणे वाईट तर आहेच
हबकून मौन होणे वाईट तर आहेच
पण सर्वात धोकादायक नसते
सर्वात धोकादायक असते
निर्जीव शांततेने भरून जाणे
तळमळीचा अंत आणि
सर्व सहन करत जाणे
घरातून जाणे कामावर
आणि परतून घरी येणे
सर्वात धोकादायक असते
आपल्या स्वप्नांचा मृत्यू होणे
