अनेक जाती विरोधी व्यक्तीत्वांना खुद्द भारत सरकारनेच स्वातंत्र्यानंतर प्रचारित-प्रसारित केले आहे, पण अय्यंकालींना नाही. का? कारण अय्यंकाली मुलगामी पद्धतीने आणि झुंझार पद्धतीने रस्त्यांवर उतरून संघर्षांचा रस्ता स्विकारत होते, कारण अय्यंकाली सरकारच्या सदिच्छेवर किंवा समजदारीवर भरवसा करत नव्हते, उलट जनतेच्या पुढाकारावर भरवसा करत होते. सत्ताधारी वर्ग सुद्धा त्यांच्या जीवनकार्याच्या या बाजूवर गप्प बसून असतो आणि फक्त पूजा आणि सन्मानाच्या गप्पा करतो, कारण जर कष्टकरी दलित आणि दडपलेली जनता त्यांच्याबद्दल जाणेल, तर त्यांच्या मार्गाबद्दलही जाणेल आणि हे सध्याच्या भांडवली आणि जातीयवादी सत्तेला कधीच मान्य नसेल की त्यांच्या विरोधात मुलगामी संघर्षांच्या रस्त्याने जनतेने जावे आणि स्वत:च्या पुढाकारावर भरवसा निर्माण करावा. हेच कारण आहे की अय्यंकालींच्या वारशाला जनतेच्या शक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या स्मृतींना प्रगतीशील शक्तींनी जिवंत ठेवले पाहिजे. त्यांच्या आंदोलनाच्या रस्त्याला व्यापक कष्टकरी आणि दलित जनतेमध्ये आपल्याला घेऊन जावे लागेल.