प्रश्न हा आहे की धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाने संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही? आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सद्गृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे, असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमकुवत बनवणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच नष्ट करणे आहे.