तुम्ही संघटित व्हा आणि आपल्या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्हान द्या. मग तुम्ही पाहाल की तुम्हांला अधिकार देण्याला नकार देण्याची भाषा करण्याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्ही दुसऱ्याच्या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्ही नोकरशाहीच्या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्या. तुम्हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवलवादी नोकरशाहीच आहे.