क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे.

क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे. वास्‍तवात हीच ‘क्रांती’ आहे. बाकी सारे विद्रोह हे फक्‍त मालकांच्‍या पाठिंब्‍याने चालणाऱ्या परिवर्तनाद्वारे भांडवलशाहीतील सडकेपणाच पुढे रेटत असतात. लोकांविषयी किंवा त्‍यांच्‍या प्रश्‍नांविषयी कितीही सहानुभूती दाखवली तरी जनतेपासून वस्‍तुस्थिती लपत नाही, लोक कपट ओळखतातच. भारतामध्‍ये श्रमिकांच्‍या सत्‍तेपेक्षा काहीही कमी स्‍वीकारणे आम्‍हांला मान्‍य नाही. भारतातील साम्राज्‍यवादी – आणि ज्‍यांची नाळ शोषण हा मूलाधार असलेल्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेशी जुळलेली आहे, असे त्‍यांचे हस्‍तक – यांना हुसकून देऊन भारतीय श्रमिकांना पुढे यावे लागेल. आम्‍ही गोऱ्या दुष्‍प्रवृत्‍तीच्‍या जागी काळी दुष्‍प्रवृत्‍ती आणून यातना भोगू इच्छित नाही. एक स्‍वार्थी समूह म्‍हणून या दुष्‍प्रवृत्‍ती एकमेकांची जागा घ्‍यायला तयार आहेत. शहीदे आजम भगत सिंह #bhagatsingh#revolutionary#nbs#naubhas#bhagatsingquotes#revolution#inqlaab#youth#change#radicalchange#indianrevolutionary#revolutionarypolitics#youthforrevolution

Related posts

Leave a Comment

one + 12 =